आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येदियुरप्पा समर्थक आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बंगळुरू - माजी मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा समर्थक 12 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे. बेलुरू गोपालकृष्ण व एम. व्ही. नागराजू यांनी या आशयाचे निवेदन विधानसभा सचिव पी. ओमप्रकाश यांना दिले आहे.

पक्षविरोधी कारवायामुळे 12 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी विधानसभा सचिवांना केली आहे, असे गोपालकृष्ण यांनी पत्रकारांना सांगितले. अर्जासोबत पक्षविरोधी कामात सहभागी आमदारांची सीडी देण्यात आली आहे.गेल्या गुरुवारी येड्डी समर्थक 13 आमदार विधानसभा अध्यक्ष बोपय्या यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी गेले होते. मात्र, बोपय्या परगावी असल्यामुळे त्यांना तो देता आला नाही.