आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकापेक्षा अधिक गॅस कनेक्शन धारकांना तीस दिवसांचा अल्‍टीमेटम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिवसेंदिवस एलपीजी गॅस व इंधनाची होणारी दरवाढ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. त्याचबरोबर गॅस कनेक्शन वाटपात होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने आणि तेल कंपन्यांनी कडक पावले उचलली आहेत. सरकार मंत्र्यांना आणि खासदारांना एलपीजी गॅस सिलेंडरवर मिळणारी सबशिडी बंद करण्याच्या विचारात आहे. तर दुसरीकडे तेल कंपन्या एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असणार्या ग्राहकावर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
ज्या ग्राहकांकडे एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन आहेत, किंवा परिवारातील इतर सदस्यांच्या नावावर कनेक्शन रजिस्‍टर्ड आहेत. अशा ग्राहकांचा तेल कंपन्यांनी शोध सुरु केला आहे. सर्वांना वेळेवर गॅस सिलेंडर उपलब्ध व्हावे यासाठी तेल कंपन्यांनी हे पाऊल उचलले आहे.
सर्व तेल कंपन्यांनी मिळून एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरमुळे ग्राहकाकडे एकाच कंपनीचे गॅस कनेक्शन आहे की, इतरही कंपनीचे गॅस कनेक्शन ग्राहक वापरत आहेत हे समजणार आहे. आतापर्यंत इंडियन ऑईल कंपनीने राजधानी दिल्लीत अशा ६० हजार ग्राहकांचा पर्दाफाश केला आहे. या ग्राहकांकडे एकापेक्षा जास्त कंपन्यांचे गॅस कनेक्शन आहेत. इतर कंपन्यांचे आकडे असून समोर येणे बाकी आहे.
एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शनचा वापर करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त गॅस कनेक्शन जमा करण्यासाठी ३० दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले आहे. ३० दिवसांच्या आत ग्राहकांनी अतिरिक्त गॅस कनेक्शन जमा केले नाही तर, त्यांचा गॅस सिलेंडर पुरवठा बंद करण्यात येणार आहे.
तुमच्याकडे एलपीजी कनेक्शन असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच
गॅस कनेक्शनधारकांसाठी 10 लाखांचा विमा