आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TWIST: लैलाच्या प्रेमात अफगान खान झाला होता वेडा‍पिसा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- अभिनेत्री लैला खान हत्याकांडातील गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. आता या प्रकरणात लैलाचा बॉयफ्रेंड अफगाण खानची एंट्री झाल्याने ट्‍विस्ट निर्माण झाले आहे. लैला खानसह तिच्या कुटुंबियांच्या हत्याकांड प्रकरणी पोलिस दिवसरात्र परिश्रम घेत आहे. परंतु, अद्याप लैलाच्या 'मर्डर मिस्ट्री'वरून पडदा उठण्याचे नाव नाही.
अफगाण खान अंडरवर्ल्डशी संबंधित असून, प्रापर्टी डिलिंगचे काम करतो. तो लैलाचा बॉयफ्रेड होता. तिला पत्नी बनवण्याची त्याची इच्छा होती.
तिला कोणत्याही परिस्थितीत आपले करण्याची त्याची मनिषा होती. यासाठी तो लैलासह तिच्या कुटुंबियांना धमक्याही देत होता. लैलाची संपत्ती हडपण्याचाही त्याचा कट होता, अशी माहिती आता उजेडात आली आहे.
अफगाणच्या भीतीमुळेच लैलाची आई सेलिनाने आपल्या मुलींसह दुबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. लैला हत्याकांडात अफगाणचा काही 'रोल' आहे काय? याच्या तपासात पोलिस व्यस्त आहे.
दरम्यान, क्राइम ब्रॅंचच्या अधिकार्‍यांनी बुधवारी मुंबई एअरपोर्टवर लैला खानचा पती सोनू उर्फ वफा खान याला ताब्यात घेतले. परंतु, आपण लैलाचा पती नसल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. एवढेच नाही तर वफा खानने त्याची पत्नी यासमीन खानसोबत झालेल्या साखरपुड्याचे फोटोही पोलिसांना दाखविले.
दुबईतील रहिवासी असलेला वफा खान हा लैलाचा पती असल्याचा पोलिसांना संशय होता. दुबईहून मुंबईला आल्यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले होते. सोनू खान हा दुबईतील एनआरआय कमल जधवानीचा मुलगा आहे. त्याने मुस्लिम धर्म स्विकारला होता. तेव्हापासून तो वफा खान या नावाने ओळखला जात आहे.
अभ‍िनेत्री लैला खानचा पती वफी खानला मुंबई एअरपोर्टवर अटक
लैला खान हत्याकांड: डीएनएसाठी सांगाड्यांचे नमुने पाठविले- हिमांशू रॉय
लैला खानचे उंटदरीतील फार्महाऊस आईच्या नावावर