आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एलओसी'वरील 2 जवान काश्मीरमध्ये हिमकडा कोसळून ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत असून, तेथे हिमकडा कोसळून दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. कुपवाडा जिल्ह्यातील नौगम परिसरातील एका ठाण्यातील दोन जवान गस्त घालत असताना एक हिमकडा कोसळला. मात्र संरक्षण विभागातर्फे यांची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आली नाही. दरम्यान लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांनी एलओसीवर शहीद झालेल्या लान्सनायक सुधाकर यांच्या घरी जावून कुटुंबियांची भेट घेतली.
गेल्या काही दिवसापासून उत्तर भारतात मोठी बर्फवृष्टी होत आहे. उत्तर काश्‍मीरमधील नौगम परिसरात अतिशय बिकट परिस्थिती आहे. तेथे दहा ते बारा फूटांपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे. आज सकाळी तेथील भागात दोन भारतीय जवान गस्त घालत असताना तेथील हिमकड्याचा काही भाग अचानक कोसळला. त्यामुळे एलओसीच्या गस्तीवर असलेले दोन जवान त्याखाली गाडले गेले. तेथील हवामान अतिशय खराब असून, ऑक्सिजनही पुरेसा मिळत नसल्याने जवानांचे मृतदेह बाहेर काढण्याच्या मोहिमेला अडचणी येत असल्याचे म्हटले आहे.