आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन दिवसाचे देशव्यापी संप बुधवारपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दरवाढीला आळा घालण्यात सरकारला आलेले अपयश आणि कामगार कायद्याच्या उल्लंघनाच्या विरोधात 11 कामगार संघटनांनी बुधवारी दोनदिवसीय देशव्यापी संपाचे आवाहन केले आहे.


एआयटीयूसीचे राष्‍ट्रीय सरचिटणीस गुरुदास दासगुप्ता यांनी सांगितले की, देशभरातील विविध राष्ट्रीय कामगार संघटना दोनदिवसीय संपासाठी एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. गगनाला भिडणारी महागाई, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक व कामगार कायद्यातील ढिसाळपणा रोखण्यासाठी सरकारने काहीच उपाययोजना केल्या नाहीत, अशी टीका दासगुप्ता यांनी केली. सरकार आमच्या मागण्या ऐकून घ्यायलाही तयार नाही. यासंदर्भात आमच्या मागण्यांना उत्तर द्यायला तयार नसल्यानेच कामगार संघटनांनी संप पुकारला आहे, असे ते म्हणाले.संघटनांच्या मागण्यांसंदर्भात कामगारमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी 13 फेब्रुवारीला अखेरच्या क्षणी बैठक बोलावली,परंतु ती निष्फळ ठरली. उलट त्यामुळे आमचा संपाचा निर्धार अधिक दृढ झाला. कामगार मंत्रालयाशी संबंधित कुठल्याच प्रकरणाची सोडवणूक करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला नाही, असा आरोप त्यांनी केला.


10 कोटी कामगार सहभागी होणार
बुधवारपासून होणा-या दोनदिवसीय देशव्यापी संपात 18 कामगार संघटना व 10 कोटींपेक्षा जास्त कामगार सहभागी होणार असल्याचा दावा दासगुप्ता यांनी केला. या संपाचे आवाहन भारतीय कामगार संघ, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, हिंद कामगार सभा, सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन, ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर व इतर संघटनांनी केले आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना न केल्यास आगामी काळात आंदोलनाची धार अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा एआयटीयूसीचे राष्‍ट्री य सचिव अमरजित कौर यांनी दिला.बोनस व पीएफवर घातलेल्या मर्यादा हटवण्यात यावी तसेच सर्वांना पेन्शन लागू करण्यात याव्यात आदी मागण्या कामगार संघटनांनी केल्या आहेत.