आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलाहाबाद कुंभमेळयात चेंगराचेंगरी, दोन ठार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद- महाकुंभमेळयात मौनी अमावस्‍येनिमित्त पवित्र स्‍नान करण्‍यासाठी जमलेल्‍या भाविकांमध्‍ये झालेल्‍या चेंगराचेंगरीत एका स्‍त्रीसह दोन जण ठार झाले. स्‍नान करून परतत असताना झालेल्‍या गोंधळात ही चेंगराचेंगरी झाली असल्‍याचे बोलले जाते. संगमावर तीन कोटीहून अधिक भाविक स्‍नानासाठी दाखल झाले आहेत. ही घटना संध्‍याकाळी घडली.

सेक्‍टर 12 येथे झालेल्‍या चेंगराचेंगरीत वाराणसी येथील एक महिला आणि पश्चिम बंगालमधील एका पुरूषाचा मृतामध्‍ये समावेश आहे. ते पवित्र स्‍नानासाठी येथे आले होते. या चेंगराचेंगरीत काही जणांना किरकोळ दुखापतही झाली आहे. त्‍यांच्‍यावर उपचार सुरू असल्‍याची माहिती सेक्‍टर मॅजिस्‍ट्रेट अभय राज दिली. आता परिस्थिती नियंत्रणात असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.