आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Members From NAC Had Submitted Mercy Petition For Kasab

सोनियांच्‍या टीममधील दोघांनी केली होती कसाबच्‍या माफीसाठी याचिका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- मुंबई हल्‍ल्‍याचा दोषी अजमल आमिर कसाबला फाशी देण्‍यात आली. परंतु, राष्‍ट्रीय सल्‍लाकार समितीच्‍या दोन सदस्‍यांनी त्‍याला फाशी देऊ नये, अशी भूमिका घेतली होती. कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्ष सोनिया गांधी या समितीच्‍या अध्‍यक्ष आहेत. समितीचे दोन सदस्‍य अरुणा रॉय आणि हर्ष मंदर यांनी कसाबला माफीसाठी राष्‍ट्रपतींकडे अर्ज केला होता. माहितीच्‍या अधिकारांतर्गत केलेल्‍या अर्जाच्‍या उत्तरात ही माहिती देण्‍यात आली आहे.

अजमल कसाब आणि त्‍याच्‍या साथीदारांनी 26 नोव्‍हेंबर 2008 ला मुंबईवर हल्‍ला केला होता. त्‍यात 166 जणांचा मृत्‍यू झाला होता. या हल्‍लेखोरांपैकी फक्त अजमल कसाब जिवंत हाती लागला होता. त्‍याच्‍या फाशीवर सर्वोच्‍च न्‍यायालयाने शिक्‍कामोर्तब केले होते. परंतु, त्‍याने राष्‍ट्रपतींकडे दयायाचिका केली होती. यासंदर्भात राष्‍ट्रपतींकडे एकूण 203 याचिका आल्‍या होत्‍या. त्‍यापैकी राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीच्‍या दोन सदस्‍यांनी कसाबच्‍या माफीसाठी याचिका केली होती.