आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Ministers Quit, Rebel MLAs Seek Governor's Intervention

कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता धोक्यात; 2 मंत्र्यांसह 20 आमदारांचे राजीनामे?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु- कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता धोक्यात आली असून, आज येडियुरप्पा यांचे समर्थक आमदार व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या मंत्रिमंडळातील शोभा करंदलाजे आणि सी एम उडाशी या दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. याचबरोबर वरील दोन मंत्र्यांसह किमान २० आमदार भाजपमधून फुटून येडियुरप्पा यांच्या कर्नाटक जनक्रांती पक्षात लवकरच सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आज सकाळी दोन मंत्र्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे राजीनामा देताच 'हाय होल्टेज ड्रामा' झाला. सार्वजनिक बांधकाम मंत्री सी एम. उडाशी आणि ऊर्जा मंत्री शोभा करंदलाजे यांनी सभापती के जी भोपय्या यांच्या कार्यालयात राजीनामे सादर केले. भोपय्या हे नेपाळ दौ-यावर असून, त्यांच्या सचिवाकडे हे राजीनामे सादर आहेत. भोपय्या परत येताच याबाबत निर्णय होईल. दरम्यान, भाजपमध्ये अनेक बंडखोर आमदार असून, ते लवकरच येडियुरप्पा यांच्या पक्षात सामील होणार असल्याचे कळते. येत्या मे महिन्यात कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.