आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न स्कूटर ना बाइक, ‘दुचाकी कार’ सी-1

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - थंडी, पाऊस, ऊन, वारा, धूळ या सारख्या कटकटी नाहीत की पार्किंगसाठी भलीमोठी जागा शोधण्याची गरज. कारला चार चाकं असतात, हे सर्वांना माहित असेल...
पण आता आली आहे नवी ‘टू व्हीलर’ कार सी-1. या कारला चारचाकी कारच्या तुलनेत एक चतुर्थांशच जागा पार्किंगसाठी लागेल, तसेच इंधनही कमी जळेल. वाहनावर चांगल्या नियंत्रणासाठी कारसारखे स्टेअरिंग व्हीलचीही सुविधा असेल. अमेरिकेच्या लिट मोटर्सने अत्याधुनिक इलेक्ट्रिक दुचाकी कार सी-1ची निर्मिती केली आहे. कंपनीचा डिझायनर डॅनियल किमने आपली कल्पना प्रत्यक्षात साकार केली आहे.
स्टँड नाही, स्टँडिंग सिस्टिम
या दुचाकी कारचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे स्टँडिंग सिस्टिम. हेलिकॉप्टरमध्ये संतुलनासाठी वापरल्या जाणारी गायरोस्कोपिक स्टॅबिलायझिंग सिस्टिम या कारमध्ये वापरण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान गुरुत्त्वाकर्षणावर आधारित आहे. यात कोणतेही स्टँड नाही, ना तिसरे चाक. तरीही ही कार खाली पडत नाही. ही कार थांबल्यास वा दुस-या वाहनाशी धडकल्यास तिची स्टँडिंग यंत्रणा आॅटोमॅटिकपणे सुरू होते. यासाठी कारमध्ये अत्याधुनिक सेंन्सर्स
लावण्यात आले आहेत.
निर्मितीमागची कारणे
आॅटोमोबाइल डिझायनर डॅनियल किम एकदा विश्व सफरीवर गेले. विकसनशील देशांत दुचाकी वाहनांचा वापर वेगाने वाढत आहेत. सोपे, सुटसुटीत, लवकर पार्क होणा-या आणि गर्दीत झटकन मार्ग काढणा-या दुचाकींचे वैशिष्ट्य त्यांना भावले. मायलेजही अधिक असले तरी दुचाकींत अनेक अडचणी आहेत. यामुळे कारचे वैशिष्ट्य असलेली दुचाकी कार बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
अशी आहेत वैशिष्ट्ये
आधुनिक कारसारखी इंटरनेटची सुविधा, मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक गॅजेट चार्जर, ब्ल्यूटुथ, स्पीकर-मोबाइल कनेक्टिव्हिटी कारसारखे अत्याधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त ब्रेकिंग सिस्टिम कारसारखेच दोन्ही सीट्सवर सीट बेल्टची सुविधा