आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Udhao Thakaray Suns Aditya Thakaray Get Telecom Regulatory Authority Of India (trai

उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंची लवादाकडे धाव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: दिवसभरात केवळ 200 एसएमएस पाठवण्याच्या दूरसंचार प्राधिकरणाच्या (ट्राय) मर्यादेविरुद्ध शिवसेनेचे कार्यकारीप्रमुख उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी दूरसंचार लवादाकडे धाव घेतली आहे. ट्रायचा हा निर्णय जुलमी असून घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य हक्काविरोधात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. युवा सेनेचा अध्यक्ष या नात्याने मला जनता आणि कार्यकर्त्यांशी सतत संपर्कात राहावे लागते. त्यामुळे वैयक्तिकरीत्या सूट देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. दूरसंचार लवादाचे (टीडीसॅट) चेअरमन न्या.एस. बी. सिन्हा यांनी ही याचिका दाखल करून घेतली असून ट्रायला दोन आठड्यांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे. याप्रकरणी 13 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.