आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज-उद्धव यांनी एकत्र यावे; अभिनेता नाना पाटेकरांचे आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Raj with Udhav - Divya Marathi
Raj with Udhav

नवी दिल्ली- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव आणि महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले आहे. आपल्या सर्वांच्या हितासाठी एकत्र काम करा, असे आवाहन आपण दोघांनाही केले असल्याचे ते म्हणाले.
एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात 62 वर्षीय नानाने हे आवाहन केले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपण पित्यासमान मानत होतो. मात्र, त्यांनी निवडणुकीत कधीच आपल्याला पक्षाचे तिकीट दिले नाही, असेही नाना म्हणाला. आता सक्रिय राजकारणात उतरण्याची शक्यताही त्याने फेटाळली.
शरद पवार आणि सोनिया गांधी या दोन्ही नेत्यांकडून आपण कधीही अपेक्षा ठेवली नाही. म्हणूनच त्यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध कायम राहिल्याचे नाना म्हणाला.

‘26/11’ चित्रपटातील भूमिकेचे कौतुक
‘26/11’ हा रामगोपाल वर्मा यांचा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह सर्वांनीच चित्रपटातील नानाच्या भूमिकेचे कौतुक केले. याबद्दल नानाने समाधान व्यक्त केले. या चित्रपटातून चांगला संदेश दिला असल्याचे नाना म्हणाला.