आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी माझा नव्‍हे तर गरीबांचा अपमान केलाः उमा भारती यांचे प्रत्‍युत्तर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्‍या नेत्‍या उमा भारती कॉंग्रेसचे सर‍चिटणीस राहुल गांधींवर चांगल्‍याच भडकल्‍या आहेत. राहुल गांधींनी माझा अपमान केला असून त्‍यांनी माफी मागितली पाहिजे, असे सांगून उमा भारती यांनी राहुल गांधींवर कडाडून हल्‍ला चढविला.
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेमध्‍ये उमा भारतींवर टीका करताना म्‍हटले होते की त्‍यांना मध्‍य प्रदेशातून हाकलले होते. त्‍यानंतर त्‍या उत्तर प्रदेशात आल्‍या. यावर उत्तर देताना उमा भारती म्‍हणाल्‍या, माझ्यावर टीका करण्‍यापूर्वी राहुलने त्‍यांच्‍या आईची पार्श्‍वभूमी लक्षात ठेवली पाहिजे. राहुलने माझ्याबद्दल असभ्‍य शब्‍द वापरले आहेत. ते चांदीचा चमचा घेऊन जन्‍माला आले आहेत. अनेक प्रधानमंत्री त्‍यांचे नातेवाईक होते. परंतु, मी गरीब कुटुंबातून आली आहे. मी संघर्ष करुन पुढे आली. त्‍यांना सर्व सहज मिळाले आहे. मी पक्ष सोडला होता. परंतु, राष्‍ट्रवादी विचारांना कधीही सोडले नाही. तिरग्‍यासाठीच मी मुख्‍यमंत्रीपद सोडले होते. राहुलने माझ्यावर टीका करताना काही गोष्‍टी लक्षात ठेवल्‍या पाहिजे, असे उमा भारती म्‍हणाल्‍या. राहुल गांधींच्‍या वक्तव्‍याला भाजपकडून प्रत्युत्तर म्हणून अवमानजनक वक्तव्य करणार नसल्याचे उमा भारती यांनी सांगितले.राहुल गांधींची अवमानजनक वक्तव्ये हा माझा नव्‍हे तर गरिबांचा अपमान आहे, असे त्‍या म्‍हणाल्‍या.
बुदेलखंड जिल्ह्यातील चारखारी येथून उमा भारती निवडणूक लढविणार आहेत. आरक्षणाशिवायदेखील मुस्लिमांचा विकास होऊ शकतो, असे उमा भारती यांनी सांगितले. अण्‍णा हजारेबाबत विचारले असता त्‍या म्‍हणाल्‍या की, ते एक सिद्धपुरुष आहेत. राजकारणापासून दुर राहत त्‍यांनी आंदोलन कायम ठेवले पाहिजे.
उमा भारती युपीच्या विधानसभा आखाड्यात
उमा भारती-राहुल वाक्युद्ध
राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशात दाखविले काळे झेंडे!
'सोनिया आणि राहुल गांधींमध्‍ये मतभेद'