आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सालेमचे प्रत्यार्पण पोर्तुगाल कोर्टात रद्द

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम याचे प्रत्यार्पण पोर्तुगालच्या सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवले. याविरुद्ध सीबीआय तेथील घटनापीठाकडे दाद मागेल. तेथेही निकाल कायम राहिला तर मात्र सालेमला पुन्हा पोर्तुगालच्या हवाली करण्याशिवाय भारताला पर्याय नाही.
अबू सालेम याला 2005 मध्ये भारत-पोर्तुगालदरम्यान असलेल्या प्रत्यार्पण करारानुसार लिस्बन येथील तुरुंगातून भारतात आणण्यात आले होते. प्रत्यार्पण केल्या जाणाºया कैद्याला फाशीची शिक्षा किंवा 25 वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकत नाही, अशी तरतूद या करारात आहे. मात्र मुंबईत टाडा कोर्टात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये सालेमवर बॉम्बस्फोट प्रकरणी फाशीची शिक्षेची तरतूद असलेली कलमे लावण्यात आली होती. या मुद्द्यावर सालेमचे वकील अरविंदकुमार शुक्ला यांनी लिस्बनच्या हायकोर्टात अपील केले होते. हे अपील मान्य करण्यात आले.