आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Home Minister P Chidambaram Was U Tern For Influence Of Middle Class

मध्यमवर्गीयांची क्रुर थट्टा करणार्‍या पी चिदंबरम यांचा 'यु टर्न'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- महागाईच्या मुदद्यावर मध्यमवर्गीयांबाबत केलेले वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांच्या अंगाशी आले आहे. महागाईच्या मुदद्यावरून पी. चिदंबरम यांनी मंगळवारी मध्यमवर्गीयांच्या मानसिकतेवर चांगलेच तोंडसुख घेऊन सरकारचा बचाव केला होते.
कायम विमानाने प्रवास करणारे, वातानुकुलित घरात राहणाऱया चिदंबरम यांनी सामान्य लोकांना महागाईबाबत ज्ञानाचे डोस पाजले होते. परंतु याबाबत त्यांना स्पष्‍टीकरण द्यावे लागले.
'मी मध्यमवर्गीयांची थट्टा केली नाही. मध्यमवर्गीय असाही उल्लेख केला नाही. मी 'आम्ही' म्हणालो होतो.', असे स्पष्‍टीकरण चिदंबरम यांनी दिले आहे.
दरम्यान, लोक आईस्क्रिम आणि पाण्याच्या बाटलीसाठी 15 रुपये खर्च करतील, पण गहू-तांदूळ रुपयाने महागला तर सहन करू शकत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी मध्यमवर्गीयांची थट्टा केली. महागाईच्या मुदद्यावर त्यांनी सरकारचा बचाव केला. प्रत्येक बाबतीत सरकार मध्यमवर्गीयांचा विचार करू शकत नाही, असेही ते म्हणाले होते.
मध्यमवर्गीयांची त्यांनी क्रुर थट्‍टा केल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी केला होता. महागाईला आवर घालण्यात अपयश आल्याने सरकार आता सामान्य लोकांवरच आरोप करत असल्याचे ते म्हणाले होते.
यापूर्वी केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी कॉंग्रेसला घराचा आहेर दिला होता. तसेच कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना निष्क्रीय म्हटले होते. परंतु त्यांच्यावरही स्पष्‍टीकरण देण्याची नामुष्‍की ओढवली होती.
'20 रुपयाचे आईस्क्रीम चालते मग तांदळामागे रुपया सहन होत नाही!'
चिदंबरम अडचणीत; मद्रास हायकोर्टात चालणार खटला
भोजपुरीत बोलून चिदंबरम यांनी मिळवली वाह...वाह