आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठांनी बेकायदा जमवले 1600 कोटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे (इग्नू) माजी कुलगुरू व्ही. एन. राजकृष्णन पिल्लाई यांनी दोन खासगी विद्यापीठांना दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमात बेकायदेशीररीत्या मदत करत 1600 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे सीबीआय तपासात उघड झाले आहे. पिल्लई यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात हा गैरव्यवहार केला.
पिल्लई यांच्या घरावर टाकलेल्या धाडीत दोन कोटी रुपये गुंतवणुकीची कागदपत्रे आढळून आली, असा दावा सीबीआय सूत्रांनी केला आहे. पंजाब तांत्रिक विद्यापीठ आणि सिक्कीम मणिपाल विद्यापीठांना दूरस्थ शिक्षणाची सुविधा देण्यासाठी आर्थिक व्यवहार झाला काय, याबाबत तपास सुरू आहे. सीबीआयने पिल्लई आणि दोन्ही विद्यापीठांच्या त्या वेळच्या अधिका-यांची चौकशी केली आहे. येत्या आठवड्यात आणखी चौकशी करण्यात येणार आहे. सिक्कीम मणिपाल विद्यापीठाने 400 कोटी तर पंजाब तांत्रिक विद्यापीठाने 1200 कोटी रुपये या अभ्यासक्रमाद्वारे जमा केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. दोन्ही विद्यापीठांनी नियमांकडे डोळेझाक करत हे अभ्यासक्रम राबवले. दूरस्थ शिक्षण समितीचे अध्यक्ष या नात्याने पिल्लई यांनी दोन्ही विद्यापीठांना मंजुरी दिली. विशेष म्हणजे तशी परवानगी देण्याचा त्यांना अधिकार नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरील परिणामाची शक्यता पाहता सीबीआय सूत्रांनी राबवलेल्या अभ्यासक्रमाची माहिती देण्यास नकार दिला.