आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unrest In Kashmir Due To Called Band By Separatist

फुटीरतावाद्यांच्या बंदमुळे काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- काश्मीर विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झाले. काश्मिरी विद्यार्थ्याने हैदराबादमधील एका वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली होती. मजलिस मश्वरतने हा बंद पुकारला होता. बंदमुळे दुकाने, बॅँका, पेट्रोल पंप आणि अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. रस्त्यावर खासगी वाहने, टॅक्सी व ऑटोरिक्षांची संख्या तुरळक होती. काश्मीर खो-यात शाळा, महाविद्यालये बंद होती.