आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Unsuccessful Bidders In Fresh 2G Auction To Cease Operation Says Sc

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्‍या स्‍पेक्‍ट्रम लिलावात सहभागी न झालेल्‍या कंपन्‍यांचे काम बंद कराः SC

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- नव्याने झालेल्या 2जी स्पेक्ट्रम लिलावात स्‍पेक्‍ट्रम मिळाले नाही तसेच ज्‍यांनी सहभाग घेतला नाही, अशा कंपन्‍यांचे कामकाज बंद करावे, असे आदेश सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिले आहेत. तसेच ज्या कंपन्यांना नव्याने झालेल्या लिलावात स्‍पेक्‍ट्रम मिळाले होते, त्‍यांनी त्‍या त्‍या सर्कलमध्‍ये तत्‍काळ दूरसंचार सेवा सुरू करावी असा आदेशही न्‍यायालयाने दिला आहे. तसेच दुसरा महत्त्वाचा निर्णय म्‍हणजे, सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेब्रुवारी 2012 मध्‍ये परवाने रद्द करण्‍याबाबत दिलेला निर्णय 900 मेगाहर्ट्झ बँडवर सुरु असलेल्‍या सेवेवर लागू नाही, असेही न्‍यायालयने स्‍पष्‍ट केले आहे.

गेल्या वर्षी देशभरात गाजलेल्या स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायलयाने 122 परवाने रद्द केले होते. त्‍यानंतर नोव्‍हेंबर 2012 मध्‍ये नव्‍याने लिलाव घेण्‍यात आला. या लिलावामध्‍ये ज्‍यांना परवाने मिळाले, त्‍यांनी तत्‍काळ सेवा सुरु करावी, असे सर्वोच्‍च न्‍यायालयाने म्‍हटले आहे. परवाने रद्द झाल्‍यानंतरही सेवा सुरु ठेवण्‍यास मंजूरी दिली होती, अशा कंपन्‍यांनी नव्‍या दरानुसार किमान आधारभूत रक्‍कम भरण्‍याचे निर्देश न्‍यायालयाने दिले आहे. तसेच नव्‍या लिलावामध्‍ये सहभाग घेतला नाही, अशा कंपन्‍यांची सेवा तत्‍काळ बंद करावी, असे आदेश न्‍यायालयाने दिले आहेत. तसेच न्यायालयाने परवाने रद्द केलेल्या संपूर्ण टू-जी स्पेक्ट्रमचा ताबडतोब नव्याने लिलाव करावा असा आदेशही दिला आहे.

परवाने रद्द केलेल्या कंपन्यांमध्ये सिस्टिमा श्याम, युनिनॉर, व्हिडीयोकॉन, टाटा टेलिसर्व्हिसेस आदींचा समावेश होता. तर नोव्हेंबरच्या लिलावामध्ये भारती एअरटेल, व्होडाफोन, टेलिनॉर प्रवर्तक असलेली टेलीविंग्ज, व्हिडीओकॉन व आयडिया सेल्युलर यांचा समावेश आहे.