आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेश मंत्रिमंडळ विस्‍तार; 12 नव्‍या चेह-यांचा समावेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ- उत्तर प्रदेशमध्‍ये अखिलेश यादव सरकार मंत्रिमंडळाचा गुरूवारी पहिल्‍यांदाच विस्‍तार करण्‍यात आला. मंत्रिमंडळात 12 नव्‍या चेह-यांचा समावेश करण्‍यात आला असून यामध्‍ये एक कॅबिनेट, एक राज्‍यमंत्री (स्‍वतंत्र प्रभार) आणि 10 राज्‍यमंत्र्यांचा समावेश करण्‍यात आला. यात नव्‍या चेह-यांचा मोठया प्रमाणात समावेश आहे.

राजभवनमध्‍ये मुख्‍यमंत्री अखिलेश यादव यांच्‍या उपस्थित गुरूवारी आयोजित राज्‍यपाल बी.एल जोशी यांनी 12 सदस्‍यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. समाजवादी पक्षाचे प्रवक्‍ता राजेंद्र चौधरी यांना कॅबिनेट मंत्री आणि विजय कुमार मिश्रा यांना राज्‍यमंत्री (स्‍वतंत्र प्रभार) बनवण्‍यात आले आहे.

राज्‍यमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे -
मनोज पांडे, गायत्री प्रसाद प्रजापती, विनोद सिंग उर्फ पंडित सिंग, योगेश प्रतापसिंग, राम सकल गुर्जर, आलोक कुमार शाक्‍य, राम मूर्ती वर्मा, पवन पांडे आणि नितीन अग्रवाल.

मुख्‍यमंत्री अखिलेश यादव मंत्रिमंडळ विस्‍तारात जाती आणि विभागीय संतुलन राखण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. मंत्रिमंडळ विस्‍तारात पाच मागास समाजातील, तीन ब्राह्मण, एक जाट आणि एक वैश्‍य समाजाचा आहे.