आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉंग्रेसच्‍या 'धमकी' प्रकरणी सप करणार निवडणुक आयोगाकडे तक्रार

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्‍या पाचव्‍या टप्‍प्‍यात 13 जिल्‍ह्यातील 49 जागांसाठी गुरूवारी मतदान सुरू झाले आहे. यादरम्‍यान केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्‍वाल यांनी केलेल्‍या वादग्रस्‍त विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. युपीमध्‍ये कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आले नाही तर राज्‍यात राष्‍ट्रपती शासन लागू करण्‍यात येईल, असे जयस्‍वाल यांनी म्‍हटले आहे. तर समाजवादी पक्षाने यास प्रत्‍युत्तर देताना कॉंग्रेस पक्षाची तक्रार निवडणुक आयोगाकडे करणार असल्‍याचे म्‍हटले आहे.
यापूर्वी समाजवादी पक्षाच्‍या एका नेत्‍याने त्‍यांचा पक्ष दोन तृतीयांश बहुमताने सत्तेवर येण्‍याचा दावा केला होता. दुसरीकडे बहुजन समाज पक्षाने या दोन्‍ही पक्षांचा दावा फेटाळला असून पराभव समोर दिसत असल्‍यामुळेच कॉंग्रेस असे विधान करत असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.
एक वाजेपर्यंत 40 टक्‍के मतदान
युपीमधील पाचव्‍या टप्‍प्‍यात दुपारी एक वाजेपर्यंत 40 टक्‍के इतके मतदान झाले आहे. काशीरामनगरमध्‍ये 11, महोबा-9, इटावा-8, मैनपुरी-9, ललितपूर-11, एटा-12, रमाबाई नगर-12, हमीरपूर-9, झासी-10 तर ओरेयामध्‍ये 12 टक्‍के इतके मतदान झाले आहे.
पाचव्‍या टप्‍प्‍यात भाजपच्‍या उमा भारती, प्रेमलता कटियार, सच्चिदानंद हरीसाक्षी महाराज आणि सपचे शिवपाल सिंह यादव हे नशीब आजमावत आहेत. या टप्‍प्‍यामध्‍ये 31 टक्‍के उमेदवार गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमीचे असून यामध्‍ये सपचे रामवीर सिंह यांच्‍यावर सर्वाधिक 18 गुन्‍ह्यांची नोंद आहे.
राहुल गांधींनी माझा नव्‍हे तर गरीबांचा अपमान केलाः उमा भारती यांचे प्रत्‍युत्तर