आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीमुळे उमेदवारांचे ‘सात फेरे’ संकटात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या - आचारसंहिता लागू होण्याआधी लग्न केले असते तर परवडले असते. आता उगाच तीन महिने लग्न लटकले,असे म्हणण्याची वेळ उत्तर प्रदेशातील एका उमेदवारावर ओढवली आहे. कारण आयोगाच्या कृपेने लग्नावरील खर्च निवडणूक खर्च म्हणून ग्राह्य धरला जात आहे. त्यामुळे हा उमेदवार वेगळ्याच पेचात अडकला आहे.
अयोध्या मतदारसंघातून एक नवयुवक समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. नारायण ऊर्फ पवन पांडे असे त्याचे नाव. सहा महिन्यांपूर्वी कुटुंबीयांनी त्याचा विवाह निश्चित केला. 18 जानेवारीला होणाºया या विवाहासाठी मंगल कार्यालय, बँड - बाजा, केटरिंग पत्रिका, कपडे खरेदी असा सर्व थाट ठरला. परंतु उमेदवाराचेच लग्न असल्याने साहजिकच तेथे भरपूर लोक येणार व त्यातून प्रचाराचाही उद्देश साध्य केला जाणार. त्यामुळे हा खर्च निवडणूक खर्च म्हणून ग्राह्य धरावा लागेल, असे निवडणूक अधिकाºयांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात पाच वेळा अयोध्येचे आमदार राहिलेले भाजप उमेदवार लल्लू सिंह यांनी आयोगाकडे तक्रार देऊन लग्नात मतदारांना भूलवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी केला जात असल्याची तक्रार दिली आहे. यावर उमेदवार पवन पांडे यांनी पराभवाच्या भीतीने आपल्या राजकीय विरोधकांनी हे कारस्थान केल्याचा आरोप केला आहे. लग्नासाठी सर्व गोष्टी अ‍ॅडव्हान्स देऊन निश्चित केल्या आहेत. त्यामुळे आयोगाने हा निर्णय बदलावा अशी मागणी त्याने केली आहे.

मायावतींची आचारसंहिता
बसपा प्रमुख मायावती यांनी पक्षाच्या उमेदवारांसाठी स्वतंत्ररीत्या आचारसंहिता जारी केली आहे. 83 पानांच्या या पुस्तिकेत उमेदवाराने तिकीट मिळाल्यापासून किंवा मैदानात उतरल्यापासून काय करावे आणि काय करू नये, यासाठी विविध सूचना देण्यात आल्या आहेत. आचारसंहिता किंवा अन्य कुठल्या कचाट्यात उमेदवार अडकू नयेत यासाठी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना पाच वकिलांचे पॅनल सज्ज ठेवण्यास सांगितले आहे. याशिवाय उमेदवार स्वत:चे दोन वकील नियुक्त करील, जे पक्षाच्या लिगल सेलशी संलग्न असतील.