आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uttar Pradesh Budget Laptop For Students And Unemployment Payment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युपी बजेट : बेरोजगारांना भत्ता, विद्यार्थ्यांना लॅपटॉप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - बेरोजगारांना भत्ता, विद्यार्थ्यांना लॅपटॉप अशा घोषणांचा समावेश असलेला अर्थसंकल्प मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मांडले आहे. कोणताही नवीन कर न लावता कृषी क्षेत्राला भरघोस कर्ज उपलब्ध करून देणे या मुद्दय़ांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. यामाध्यमातून निवडणुकीच्या काळात देण्यात आलेले वचन पाळले आहे, असा दावा यादव यांनी केला आहे.

भ्रष्टाचाराने पोखरलेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्याचे काम नवीन सरकारने केले आहे. या अर्थसंकल्पात कोणत्याही नवीन कराचा समावेश नाही. या शिवाय अनेक सुविधा जनतेला पुरवण्यात येणार आहेत. त्याचीही तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. यामुळे समाजातील शेवटच्या घटकालाही फायदा होणार आहे.

बेरोजगार युवकांना भत्ता देण्यासाठी 1 हजार 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर बेरोजगारांना देण्यात येणार्‍या इतर सुविधांचा लाभ राज्यातील 9 लाख लोकांना होणार आहे. 30 ते 40 या वयोगटातील नागरिकांचा यात समावेश आहे. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी संगणक व लॅपटॉप देण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी 2 हजार 721 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे. जे विद्यार्थी दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना याचा लाभ मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात समाजवादी पक्षाने ही प्रमुख आश्वासने दिली होती. त्याची पूर्तता करण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे. सरकारने पहिल्यांदाच अर्थसंकल्पाचा आकार वाढवला आहे. मुख्यमंत्र्यांकडेच राज्याच्या अर्थ विभागाची जबाबदारी आहे. मुलींसाठी असलेल्या कन्या विद्यादान योजनेला पुनरुज्जीवन देण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी सरकारने 446. 35 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

शेतकर्‍यांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूदीची शिफारस आहे. त्यांच्यासाठी असलेल्या विमा योजनेत एक लाखावरून पाच लाख अशी वाढ करण्यात आली आहे. याशिवाय कृषी कर्जासाठी 500 कोटींची तरतूद करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. रस्ते, पूल, सिंचन व ऊर्जा क्षेत्र या पायाभूत सुविधांसाठी 23 हजार 591 कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे, असे यादव यांनी स्पष्ट केले आहे.

दोन लाख कोटींचा टप्पा ओलांडला


अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा दोन लाख कोटींचा टप्पा ओलांडणारा आहे. एवढा मोठा अर्थसंकल्प मांडण्याची ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेने हा अर्थसंकल्प 18 टक्क्यांनी मोठा आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री अखिलेश यादव यांचे कुटुंबिय आहे कर्जबाजारी