आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तराखंडमध्ये पुरात वाहून गेलेले ३४ मृतदेह सापडले, सहा अजून बेपत्ता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - उत्तराखंडमध्ये शनिवारी झालेल्या मुसळधार पावसात वाहून गेलेल्या ३४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. उत्तरकाशीतील अजूनही सहाजण बेपत्ता आहेत. उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी राजेश कुमार म्हणाले, आयटीबीपी आणि पोलिसांनी मृतदेहांचा शोध घेण्यात यश मिळविले आहे. मृतांमध्ये मानेरी-भाली येथील २३ कामगारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कल्याणचे रहिवासी बच्चूलाला चव्हाण यांचा उत्तरकाशी येथील धारासूमध्ये मृत्यू झाला. येथे झालेल्या भूस्खलनात दरडी आंगावर कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगूणा यांनी बचाव आणि मदत कार्याचा वेग वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
उत्तराखंडमध्ये ढगफुटी : 12 लोक वाहून गेले 53 जण बेपत्ता