आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Utter Pradesh Vidhansabh Election Drama Publicity

विधानसभा निवडणूक: उत्तर प्रदेशात 77 बाहुबली उमेदवार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ: निवडणूक आयोगाने विधानसभेच्या आखाड्यात गैरप्रकार होऊ नये याची खबरदारी घेतली असली तरी उत्तर प्रदेशात अजुनही बाहुबली उमेदवारांचेच चालते. कारण या रणधुमाळीत उतरलेल्या 77 उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
राष्ट्रीय निवडणूक निरीक्षण या संस्थेने या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सध्या राज्यात 617 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यातील 77 उमेदवार हे गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण यासारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.
या रिंगणात असलेल्या 69 उमेदवारांनी वेगवेगळ्या कारणांनी तुरुंगाची हवा खाल्ली आहे. यात मुन्ना बजरंगी, ब्रजेश सिंग, अतिक अहमद, मुख्तर अन्सारी हे बाहुबली या निवडणुकीत पुन्हा एकदा नशीब अजमावत आहेत. मदियाहो मतदारसंघातून मुन्ना हे निवडणूक लढवत आहेत.