आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Valentine Day Is Not For Indian Youth Says Asaram Bapu In Mahakumbh 2013

व्हॅलेंटाईन डे बंद करा- आसाराम बापूंचे तत्त्वज्ञान पाजाळणे सुरुच!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद- कुंभनगरीत प्रवर्चन देत असलेले संत आसाराम बापू यांच्या नि‍शान्यावर आता व्हॅलेंटाईन डे आला आहे.
कुंभनगरीत प्रवचन देताना आसाराम बापूंनी व्हॅलेंटाईन डे चा दिवस साजरा करत असल्यावरुन वक्तव्य केले. बापू म्हणाले, व्हॅलेंटाईन डे साजरा करणे ही आमची संस्कृती नाही. ही अपसंस्कृती असून यामुळे युवकांत चुकीची माहिती पोहचत आहे. त्यामुळे असे डे साजरे थांबवले पाहिजेत.
आसाराम बापू यांनी आखिलेश यादव यांच्या सरकारकडे मागणी केली की, असले व्हॅलेंटाईन साजरे करण्यावर बंदी घालावी व त्याबदल्यात युवकांनी 'मातृ-पितृ' दिवस साजरा करावा. छत्तीसगड सरकारने व्हॅलेंटाईन डे बंदी घातली आहे तर तुम्ही का बंदी घालू शकत नाही. माता-पित्याचा दिवस साजरा केल्यास आई-वडिलांचा सन्मान वाढेल.