आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनस्पती तूप हद्दपार? हृदयाच्या आरोग्यासाठी साजूक तुपासह तेलाच्या वापरावर भर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर- दहा वर्षांपूर्वी घराघरांत वापरले जाणारे वनस्पती तूप आता स्वयंपाकघरातून हद्दपार झाल्याचे चित्र आहे. आरोग्याबाबत जागरूक झालेल्या खाण्याच्या शौकिनांनी वनस्पती तुपाला बाहेरचा रस्ता दाखवल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी पुºया, पराठे किंवा इतर मोठ्या प्रमाणातील गोड तळण करायचे असल्यास वनस्पती तुपाचा सर्रास वापर केला जात असे. साजूक तुपाला पर्याय म्हणून बिनधास्तपणे वनस्पती तूप वापरले जात असे. मात्र, हृदयाच्या आजारांपासून वाचण्यासाठी लोकांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करून घेतला आहे. त्यामुळे वनस्पती तुपाची जागा कमी फॅट्स असलेले सोयाबीन, शेंगदाणे, ऑलिव्ह, मोहरी तेलाने घेतली. हळूहळू हलवाई, केटरर आणि हॉटेलच्या रेस्टॉरंटमधूनही वनस्पती तुपाचा वापर 70 टक्क्यांनी कमी झाला आहे.
वनस्पती तुपाच्या एका खास ब्रँडचे प्रमोटर राजकुमार मोदी यांनी सांगितले की, सध्या वनस्पती तुपाची विक्री खूप कमी झाली आहे. राजस्थानात पूर्वी सहा ठिकाणी वनस्पती तुपाचे उत्पादन केले जात. मात्र, आता फक्त तीन ठिकाणचे प्लांट सुरू आहेत. 7 वर्षांपर्ू्वी वनस्पती तुपात बनलेले अनेक पदार्थ बाजारात विक्रीसाठी येत. मात्र, आता केवळ 5-7 पदार्थच सापडतात. राजस्थानच्या तुलनेत पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात मात्र वनस्पती तुपाची मागणी आजही जास्त आहे.
इतर तेलांचा वापर वाढला : तेल-तुपाचे मोठे व्यापारी नानिक मोरयानी यांनी सांगितले की, बाजारात उपलब्ध असलेले प्रोटिन आणि व्हिटॅमिनयुक्त सोयाबिन, शेंगदाणा तेल आरोग्यासाठी हितकारक असल्याने वनस्पती तुपाची खरेदी कमी झाली आहे. सध्या बाजारात या तुपाची केवळ 30 टक्के खरेदी होते. गृहिणींपासून मोठ्या व्यापाºयांनीही वनस्पती तुपाचा वापर कमी केला आहे. ग्रामीण भागातही याचा उपयोग कमी झाला आहे.
पक्वान्नेही साजूक तुपात.. मिठाई व्यापारी जगदीश बजाज यांनी सांगितले की, वनस्पती तुपात भेसळ असल्याच्या बातम्या आल्यानंतर पक्वान्नांमध्ये या तुपाचा वापर बंद करण्यात आला. आता सर्व पक्वान्ने साजूक तुपातच बनवली जातात. ग्राहकांचे आरोग्य हित लक्षात घेऊन वनस्पती तुपाचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
रक्ताभिसरणात अडथळा- आरएनटी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस.के. कौशिक यांनी सांगितले की, वनस्पती तूप शरीरासाठी धोकादायक आहे. वनस्पती तूप तयार करण्यासाठी वापरण्यात येणाºया आम्ल तसेच रसायनांमुळे हृदयविकाराचा धोका संभवतो. वनस्पती तूप रक्तवाहिन्यांमध्ये साठते. त्यामुळे रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो. पर्यायाने शरीरातील इतर क्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात. घसा बसण्यापासून ते हृदयविकारांपर्यंत आजार होतात. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनंत सक्सेना यांच्या मतानुसार, विदेशात आधीपासूनच वनस्पती तुपावर बंदी घालण्यात आली होती. या विषयावरील अध्ययनात हे सिद्ध झाले आहे की, वनस्पती तुपामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात तसेच हे तूप स्थूलपणा आणि नैराश्यासारख्या आजारांना कारणीभूत ठरते.