आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Verma Committee's Recommandation Soon Implements

वर्मा समितीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी :मनमोहन सिंग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - महिला अत्याचाराविरोधात वर्मा समितीने केलेल्या शिफारशींनुसार कायद्यात सुधारणा करण्यात येईल. हे बदल करण्यासाठी सरकार नेटाने पाठपुरावा करेल, असे आश्वासन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले आहे. दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या भयंकर घटनेनंतर महिला अत्याचार विरोधातील कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी निवृत्त सरन्यायाधीश जे. एस. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली तीनसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. वर्मा यांच्याव्यतिरिक्त निवृत्त न्यायमूर्ती लीला शेठ आणि माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रह्मण्यम यांचा या समितीत समावेश होता. या समितीने निर्धारित 30 दिवसांच्या कालावधीत आपला अहवाल सादर केला. त्याबद्दल पंतप्रधानांनी वर्मा यांना पत्र पाठवून आभार मानले आहेत.