आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vhp Activists Arrested For Trying To Start Amarnath Yatra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विहिंपची अमरनाथ यात्रा रोखली, 600 कार्यकर्त्‍यांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - 25 जूनच्या अगोदरच अमरनाथ यात्रेला प्रारंभ करण्याच्या प्रयत्नातील जवळपास 600 कार्यकर्त्यांना रविवारी अटक करण्यात आली. अमरनाथ देवस्थान मंडळाने 25 जून ते 2 आॅगस्टपर्यंत 39 दिवस अमरनाथ यात्रेचे आयोजन केले आहे. मात्र, यात्रेचा कालावधी 60 दिवसांचा असावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिका-याने दिली.
देशभरातून आलेल्या विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि काही संत परेड मैदान परिसरामध्ये जमा झाले होते. यात्रा लवकर सुरू करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी निदर्शने सुरू केली. पोलिसांनी नंतर त्यांना भगवतीनगर येथील यात्रा निवासामध्ये नेले. कार्यकर्त्यांना सायंकाळी सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये विहिंपचे प्रदेशाध्यक्ष रमाकांत दुबे, भाजप प्रदेश सरचिटणीस सत शर्मा, भाजयुमाचे अध्यक्ष मनीष शर्मा यांचा समावेश आहे.
दुसरीकडे अमरनाथ देवस्थान मंडळाच्या प्रवक्त्याने म्हटले की, गुहेच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी या भागाचे हवाई सर्वेक्षण केले आहे. हा परिसर बर्फाने आच्छादलेला असल्याने यात्रेला एवढ्यात परवानगी दिली जाणार नाही.
वातावरणाचा अडथळा येऊ शकतो
काश्मीर खो-यामधील बर्फवृष्टी आणि अधूनमधून पडणा-या पावसामुळे यात्रेत व्यत्यय येईल, अशी चिंता देवस्थान प्रशासनाला आहे. यात्रेसाठी आतापर्यंत 75 हजार यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे. राज्यपाल एन. एन. व्होरा आणि अमरनाथ देवस्थान मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष नवीन चौधरी यांनी रविवारी यात्रा मार्ग पहलगाम आणि बालतालमध्ये खराब हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतला. बर्फवृष्टीमुळे ते या ठिकाणी जाऊ शकले नाहीत.

पुन्हा अटकेस तयार : जैन
उद्याच्या ज्येष्ठ पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांची होती. रविवारच्या घटनेनंतर विहिंपचे राष्टÑीय प्रवक्ते सुरिंदर जैन यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्येष्ठ पौर्णिमेपासून यात्रा सुरू करण्याची जबाबदारी राज्यपालांची होती, त्यात त्यांना यश आले नाही, असे जैन म्हणाले. देशाच्या विविध भागांतून आलेले भक्त अमरनाथ गुहेकडे प्रस्थान ठेवतील. प्रशासनाने आम्हाला अडवल्यास पुन्हा एकदा अटक करून घेऊ, असा इशारा जैन यांनी दिला आहे. देवस्थान मंडळासोबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे. आजची यात्रा बेकायदा ठरवणाºया प्रशासनाला आमचे आव्हान आहे, असे जैन म्हणाले.