आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरनाथ यात्रेचा कालावधी वाढविण्‍यासाठी काश्मिरात निदर्शने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- अमरनाथ यात्रेचा कालावधी घटवण्यात आल्याचे संतप्त पडसाद जम्मू-काश्मिरात उमटले आहेत. विश्व हिंदू परिषदेसह विविध संघटनांनी यात्रेचा कालावधी वाढविण्याची मागणी करीत आज जोरदार निदर्शने केली. फुटीरतावाद्यांच्या दडपणामुळे अमरनाथ यात्रेचा कालावधी घटवण्यात आल्याचा आरोप विविध संघटनांनी केला असून अमरनाथ बोर्डाचे अध्यक्ष राज्यपाल व्होरा यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली आहे.
यात्रेचा कालावधी दोन महिन्यांवरून केवळ 39 दिवसांवर आणल्याबद्दल संतप्त निदर्शकांनी आज राज्यपाल एन.एन.व्होरा आणि जम्मू-काश्मीर सरकारविरोधात विहिंपच्या वतीने उग्र निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त निदर्शकांनी व्होरा यांचा पुतळा जाळला. व्होरा हे श्री अमरनाथ संस्थानचे अध्यक्षही आहेत. यात्रेचा कालावधी घटवल्याच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलन उभारण्याची घोषणा विहिंप नेते सुरिंदर जैन यांनी केली.
पंतप्रधान,राष्ट्रपती,गृहमंत्र्यांना हा तिढा सोडवण्याचे आवाहन करण्यात आले असून संस्थानच्या अध्यक्षपदावरून व्होरा यांची तत्काळ उचलबांगडी करण्याची मागणी विहिंपने केली आहे. राज्यपाल आणि सरकारविरोधी आंदोलन करणाºया निदर्शकांनी आज अटकही करवून घेतली.
अमरनाथ यात्रा येत्या 25 जूनला सुरू होत असून खराब हवामान आणि भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयश आल्यामुळे अमरनाथ बोर्डाने यात्रेचा कालावधी यंदा 39 दिवसांवर आणला आहे. मात्र फुटीरतावाद्यांच्या दडपणाखाली यात्रेचा कालावधी घटवण्याचा निर्णय राज्य सरकार आणि अमरनाथ संस्थानने घेतला आहे असा आरोप भाविकांनी केला आहे.
दरम्यान,विहिंपसोबतच काश्मिरी पंडितांची संघटना, तसेच विविध राजकीय पक्षांनी राज्य सरकार आणि अमरनाथ संस्थानला धारेवर धरले आहे. मुस्लिम,ख्रिश्चन समुदायाचे भाविक वर्षभरात कधीही आपल्या धार्मिक स्थळांना भेटी देऊ शकतात मग अमरनाथचे दर्शन घेण्याची मुभा का देण्यात येत नाही असा संतप्त सवाल काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीचे प्रमुख भीमसिंह यांनी केला आहे. वातावरण पोषक झाल्यानंतर सरकारने यात्रा सुरू करावी पण यात्रा दोन महिने चालली पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे जम्मू-काश्मीर प्रमुख अशोक गुप्ता यानी केली आहे. विद्यमान अमरनाथ बोर्ड बरखास्त करून केवळ यात्रा आयोजित करण्यापुरतेच अधिकार नव्या बोर्डाला देण्यात यावे अशी मागणी पनून काश्मीर संघटनेने केली आहे.फुटीरतावाद्यांचे लांगूलचालन करण्यासाठी यात्रेचा कालावधी घटवण्यात आल्याचा आरोप पनून काश्मीरने केला आहे.