आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपराष्ट्रपतिपदासाठी पुन्हा हमीद अन्सारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उपराष्ट्रपतिपदासाठी यूपीएने हमीद अन्सारी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. सलग दुस-यांदा ते या पदावर विराजमान होऊ शकतात. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव आणि बसपा नेत्या मायावती यांनी अन्सारींच्या नावाला पाठिंबा दिला तर तृणमूल काँग्रेसने कृष्णा बोस आणि गोपालकृष्ण गांधी यांची नावे सुचवली.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. यात उपराष्ट्रपती अन्सारी यांच्या नावावर एकमत झाले. 7 ऑगस्टला या पदासाठी मतदान होत आहे. पंतप्रधानांनी अन्सारींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर सोनियांनी घोषणा केली. बैठकीनंतर पंतप्रधानांनी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, एनडीएचे समन्वयक शरद यादव यांच्याशी फोनवर चर्चा करून अन्सारींसाठी पाठिंबा मागितला.