आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vikramaditya Will Be Attraction Centre In Republican Day Period

प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर होणा-या संचलनात ‘विक्रमादित्य’चे आकर्षण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- शनिवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत राजपथावर सादर होणा-या संचलनाचे मुख्य वैशिष्ट्ये ठरणार आहे ती भारताची विमानवाहू युद्धनौका आएएनएस विक्रमादित्य. रशियाकडून खरेदी करण्यात आलेल्या गोश्कोर्व्हचे नवे रूप देशवासीयांना प्रथमच दिसणार असून 45 हजार टन वजनाची ही युद्धनौका नौदलाच्या संचलन पथकात असेल.

सध्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विराट ही विमानवाहू युद्धनौका आहे. देशाची स्वदेशी बनावटीची युद्धनौका कोची बंदरात तयार करण्यात येत असून ती आयएनएस विक्रांत नावाने नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केली जाणार आहे. नौदल अधिका-या ने सांगितले की अ‍ॅडमिरल गोश्कोर्व्ह ही अतिविशाल व प्रचंड क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या सहभागानंतर भारतीय नौदलाचे सामर्थ्य अनेक पटींनी वाढणार आहे. नौदल सामर्थ्याचे दर्शन घडवणा-या यंदाच्या परेडमध्ये आयएनएस विक्रमादित्यचे (गोश्कोर्व्ह) दर्शन आणि सहभाग आकर्षणाचे केंद्र ठरेल. ही नौका म्हणजे समुद्रातील तरंगता विमानतळच असेल. छोटे लढाऊ विमान या नौकेवरून उड्डाण करू शकते. उतरताना त्यांना एका हूकमध्ये अडकवून छोट्या रनवेवर उतरवले जाते. या नौकेवर असणारी लढाऊ विमाने भारतात आली आहेत. परंतु सागरी चाचणीदरम्यान बॉयलर रूममध्ये काही त्रुटी आढळून आल्याने ही नौका नौदलात दाखल होण्याचा नियोजित कार्यक्रम डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये गोश्कोर्व्ह सागरी परीक्षणासाठी बेरेंटस समुद्रात तिच्या वेगाची चाचणी घेत असताना बॉयलर जास्त गरम होऊन यंत्रणेत दोष निर्माण झाले होते.