आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विलासराव आयसीयुमध्‍ये, प्रकृती चिंताजनक; डायलिसिस आणि व्‍हेंटिलेटरवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नईः महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री विलासराव देशमुख यांची प्रकृती स्थिर असल्‍याची माहिती त्‍यांच्‍या कुटुंबियांनी दिली आहे. विलासरावांना चेन्‍नई येथील ग्‍लेबल सुपर स्‍पेशालिटी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. विलासरावांना आयसीयुमध्‍ये ठेवण्‍यात आले असून त्‍यांच्‍या प्रकृतीवर रुग्‍णालयाचे वरीष्‍ठ डॉक्‍टर्स उपचार करीत आहेत. विलासरावांच्‍या प्रकृतीत सुधारणा होत असून त्‍यांच्‍या यकृतावर शस्‍त्रक्रीया करण्‍यात येणार आहे. जगविख्‍यात यकृतरोग तज्‍ज्ञ डॉ. मोहम्‍मद रेला हे त्‍यांच्‍यावर शस्‍त्रक्रीया करणार आहेत. दरम्यान, प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्याकडील मंत्रीपदाचा कारभार वायलर रवी यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, विलासरावांच्‍या दोन्‍ही किडन्‍या निकामी झाल्‍या आहेत. तसेच त्‍यांच्‍या यकृतावरही सूज आहे. त्‍यांना डायलिसिसवर ठेवण्‍यात आले आहे. तसेच कृत्रिम श्‍वासोच्‍छवासही देण्‍यात येत आहे. विलासरावांचा मुलगा रितेश याने यकृताचा काही भाग देण्‍याची तयारी दर्शविली आहे. 67 वर्षीय विलासरावांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्‍यात आले आहे. तेथे त्‍यांच्‍यावर विविध तपासण्‍या करण्‍यात आल्‍या. तपासणीनंतर अहवालात विलासरावांची प्रकृती चिंताजनक असल्‍याचे निदान झाले. त्‍यानंतर त्‍यांना चेन्‍नईला हलविण्‍यात आले.

लातूरमध्ये अस्वस्थता : विलासराव आजारी असल्याच्या वृत्तामुळे लातूरमध्ये अस्वस्थता आहे. माहिती मिळत नसल्याने कार्यकर्त्यांनी फोनाफोनी चालवली आहे. प्रकृतीबद्दल माहिती देण्यास कुटुंबीयांपैकी कोणी उपलब्ध होऊ शकले नाही.
विलासराव देशमुखांची प्रकृती बिघडली; विशेष विमानाने चेन्नईला हलविले
तपासणीसाठी विलासराव देशमुख ब्रीच कँडी रुग्णालयात
... आणि रितेशवर विलासराव चिडले
मला वाटले, ‘आदर्श’ लष्करासाठीच आहे - विलासराव देशमुख