आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Village Police Force To Be Set Up In West Bengal: Mamata Banerjee ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रामीण पोलिस दलाची लवकरच स्थापना; ममता यांची घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिलीगुडी - राज्यात लवकरच ग्रामीण पोलिस दल उभारण्यात येणार आहे. या दलामध्ये 3 हजार 500 पोलिस असतील, अशी घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
येथील पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीचे उदघाटन बॅनर्जी यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. राज्यातील ग्रामीण पोलिसांच्या दलास नजीकच्या भविष्यात अधिक बळकट करण्यात येईल. राज्यात 65 महिला पोलिस ठाणी उभारण्यात येतील. यातील 10 ठाणी अगोदरच सुरू झाली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.सत्तेवर आल्यानंतर 40 हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे. त्यातील 15 हजार 700 पोलिसांना जंगल महल या वन्य क्षेत्रात तैनात करण्यात आले आहे.