आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गावात 10% लोकांची गुजराण 17 रुपयांत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गेल्या दोन दशकांपासून आर्थिक सुधारणेचे वारे देशात वाहत आहे. आर्थिक विकासाचा ढोल वाजवला जात असला तरी ग्रामीण भारतातील 10 टक्के लोक 17 रुपयांपेक्षा कमी खर्चात रोजची गुजराण करत आहे. राष्ट्रीय नमुना पाहणी या शासकीय संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
देशातील अत्यंत गरीब 10 टक्के लोकांचा दरडोई मासिक खर्च 503.49 रुपये असल्याचे पाहणीत आढळून आले. जुलै 2011 ते जून 2012 या कालावधीत 2011-12 या वर्षासाठी राष्ट्रीय नमुना पाहणीच्या (एनएसएसओ) वतीने 68 वे सर्वेक्षण घेण्यात आले. त्यात या बाबी स्पष्ट झाल्या. ग्रामीण भागात रोजची गुजराण कशीबशी 17 रुपयांहून कमी खर्चात, तर नागरी भागात गरीबांचा उदरनिर्वाह 23.40 रुपयांवर चालतो. नागरी भागातील अत्यंत गरीबांचा दरडोई मासिक खर्च आहे 702.26 रुपये !
देशात 1991 नंतर उदाकीरकरणाचे युग अवतरले. त्यानंतर अत्यांत वेगाने आर्थिक सुधारणा झाल्या. या आर्थिक सुधारणांचा देशातील लोकांच्या जीवनशैलीवर नेमका काय परिणाम झाला हे तपासण्यासाठी हे सर्वेक्षण घेण्यात आले. 20 वर्षांनंतर अशाप्रकारची पाहणी करण्यात आली आहे. यंदा मार्चमध्ये नियोजन आयोगाने 2009-11 साठीचे द्रारिद्रय रेषेसाठीचे निकष जाहीर केले होते. त्यानुसार नागरी भागात रोज 28.65 रुपये तर ग्रामीण भागासाठी 22.42 रुपयांपेक्षा कमी खर्च असणा-या व्यक्ती दारिद्रय रेषे खाली येतात.

विदारक विषमता
सर्वेक्षणानुसार, नागरी भागात 70 टक्क्यांहून अधिक लोक रोज 43.16 रुपये खर्च करतात. टॉप 20 टक्के लोकांचा रोजचा खर्च 100 रुपयांवर आहे. ग्रामीण भागात निम्म्यांहून अधिक लोकांचा रोज दरडोई खर्च 34.33 रुपये आहे. ग्रामीण भागातील निम्म्यांहून अधिक लोकांचा दरडोई मासिक खर्च 1030 रुपयांपेक्षा कमी आहे, 40 टक्के लोकांचा दरडोई मासिक खर्च 922 रुपयांहून कमी आहे.