आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूरमध्ये व्हिंटेज कारचा मेळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - असे म्हटले जाते की, एखादी कार शोरूममध्ये बाहेर पडताक्षणी तिची किंमत निम्म्यावर येते, परंतु व्हिंटेज कारच्या बाबतीत नेमकी उलट परिस्थिती आहे, असेच म्हणावे लागेल. काळ जसजसा वाढत जाईल तसतसा या कारचा चार्म वाढत जातो. ब्रिटिश राजवट तसेच भारतातील राजघराण्यांच्या काळात शाही दिमतीला असणा-या जुन्या क्लासिक कार आजही सुस्थितीत आहेत.

अशा कारचे 15 वे व्हिंटेज कार प्रदर्शन जयपूर येथे आयोजित करण्यात आले होते. यात 100 पेक्षा जास्त व्हिंटेजप्रेमींनी त्यांच्या संग्रहातील जुन्या कार यात आणल्या होत्या. जयमहल पॅलेस येथे आयोजित या व्हिंटेज कार प्रदर्शनात मॉडर्न व क्लासिक कार सादर करण्यात आल्या. त्यात 1919 पासून 1998 पर्यंतच्या 104 कारचा समावेश होता. यात डॉज, केडिलेक, आॅस्टिन, शेवर्ले, जग्वार, फियाट, पॉर्शे, मर्सिडीज, ड्यूक, एमजी यासारख्या कारचा समावेश होता.

जगातील सर्वात छोटी कार : प्रदर्शनात सर्वात छोटी कार फियाट 500 हीदेखील होती. 1947 मध्ये तयार झालेल्या कारचे मालक बिरजू सिंह यांनी सांगितले की, या कारवर आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त रकमेची बोली लागली आहे.
हिटलरसाठी तयार केलेली बीटल : जागतिक युद्धाच्या काळात 1966 मध्ये बनवण्यात आलेली ही बीटल कार विशेष करून जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरसाठी तयार करण्यात आली होती. रेस्टोरर भूपेंद्र चौधरी यांनी सांगितले की हे बीटलचे पहिले मॉडेल आहे. या कारमध्ये रेअर इंजिन व एअर कूलिंग सिस्टिम होती.