आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Voluntary Retirement Ladies No Benefit Delhi High Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वेच्छेने नोकरी सोडणार्‍या महिलेला पोटगी नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्वत:चा उदरनिर्वाह करण्यास सक्षम असलेल्या परंतु स्वेच्छेने नोकरी सोडणा-या सुशिक्षित महिलेला तिच्या घटस्फोटित पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार नसल्याचा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.

सुशिक्षित आणि नोकरी करीत असलेल्या परंतु नंतर स्वेच्छेने नोकरी सोडलेल्या एका महिलेचा पोटगीचा दावा कनिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा राणी यांनी शिक्कामोर्तब केले आहे. ही महिला सुशिक्षित, स्वत:चा उदरनिर्वाह चालवण्यास सक्षम असून महिन्याला 50,000 रुपये पगाराची नोकरी तिने स्वेच्छेने सोडली. तिची काम करण्याची क्षमता असल्याने तिने दुसरी योग्य नोकरी शोधावी असे सांगत अतिरिक्त सत्र न्यायालयाने पोटगीचा दावा फेटाळून लावला होता. कनिष्ठ न्यायालयाचा हा निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरवला. मात्र मुलाच्या भरणपोषणासाठी 10 हजार रुपये देण्याचा आदेश तिच्या पतीला न्यायालयाने दिला आहे. आपण एका खासगी विमा कंपनीत असिस्टंट मॅनेजरची नोकरी करीत होतो मात्र ही कंपनी बंगळुरूला स्थलांतरित झाल्यामुळे आपण नोकरी सोडली. आपल्या घटस्फोटित नवर्‍याला मुलांना भेटता यावे म्हणून आपण बंगळुरूला जाऊ शकत नसल्याचे त्या महिलेने न्यायालयाला सांगितले.
उदरनिर्वाहासाठी पोटगी देण्याचे आदेश