आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vp Poll: Jaswant Confident Of Aiadmk, Bjd Support ‎

उपराष्ट्रपतिपद निवडणुक : जयललिता यांचा जसवंत यांना पाठिंबा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी उपराष्ट्रपतिपद निवडणुकीचे रालोआचे उमेदवार जसवंत सिंह यांना सोमवारी पाठिंबा दिला आहे. ख-या लोकशाहीत विरोधी पक्षाचे अस्तित्व राहणे आवश्यक असल्याचे मत जयललिता यांनी या वेळी व्यक्त केले.
जयललिता म्हणाल्या की, देशात लोकशाही नांदत असेल तर विरोध असायलाच हवा. सत्ताधारी आघाडीच्या उमेदवाराला जिंकण्याची संधी अधिक असते. मात्र, याचा अर्थ असा नव्हे की, इतरांनी निवडणूक लढवू नये. एआयएडीएमके पक्षाच्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या. विरोधकाचे अस्तित्व कायम राहावे तसेच लोकशाहीवरील विश्वासापोटी जसवंत सिंह यांना पाठिंबा देत असल्याचे जयललिता म्हणाल्या.