आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाकाऊ साहित्याचा कलात्मक वापर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला (हरियाणा)- कलात्मक दृष्टीला जर कृतीची जोड मिळाली तर उत्तमोत्तम कलाकृती साकारतात, ही बाब पंचकुला येथील 78 वर्षीय पी. डी. गौरी यांनी सिद्ध केली आहे. वयाचा बाऊ न करत, गौरी यांनी घरासमोर पडलेल्या बांधकाम साहित्यापैकी टाकाऊ फरशा आणि मार्बलच्या तुकड्यांपासून मंदिर, गुरुद्वारा, चर्च, वॉच हाऊस, पिरॅमिड तयार केले आहेत. यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचा गिलावा वापरलेला नाही. सिमेंट, वाळू किंवा लोखंडी सळ्यांचाही वापर केलेला नाही. फक्त फरशांचे तुकडे एकावर एक रचून ही शिल्पे साकारण्यासाठी त्यांना तीन वर्षे लागली.

गौरी सांगतात की, सर्वप्रथम घरासमोर रिकाम्या पडलेल्या भूखंडावर हरितपट्टा विकसित करण्याचा निर्धार केला. त्यास कलात्मक रूप देण्यासाठी अशी शिल्पे उभारण्याचे ठरवले. जवळपास जेथे कोठे बांधकाम सुरू असेल, तेथे जाऊन मालकाच्या परवानगीने गौरी तेथील टाकाऊ फरशांचे तुकडे स्कूटरवर घेऊन येत. ही शिल्पे साकारण्यासाठी वास्तुरचनाकार ते मजूर या सर्व भूमिका गौरी यांनीच साकारल्या. मंदिर, गुरुद्वारा, चर्चच्या प्रतिकृतींमध्ये फरशा आणि मार्बलचे बारीक तुकडे भरले. धारदार तुकड्यांमुळे त्यांच्या हाताला अनेक जखमा झाल्या, पण त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी हे क ाम सुरूच ठेवले. येथे मंदिर, चर्च, गुरुद्वारा साकारल्यावर आता मशीद उभारण्याचा गौरी यांचा मानस आहे.