आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहाच्या टपरीमध्ये प्रसूती; पश्चिम बंगालमधील घटना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बरद्वान - पश्चिम बंगालमध्ये रस्त्यावर प्रसूती होण्याच्या घटनांत वाढ होत असून तालित येथे अशीच घटना उघडकीस आली आहे. आरोग्य अधिका-यांच्या चुकीमुळे महिलेची प्रसूती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चहा टपरीमध्ये करण्यात आली. यात तिचे बाळ दगावले. या घटनेची चौकशीचे आदेश
देण्यात आले आहेत.
ही पार्वती बागडी असे या महिलेचे नाव असून ती आरोग्य अधिका-यांच्या अनास्थेमुळे तिला आपले नवजात मूल गमवावे लागले. गुरुवारी पार्वती यांना त्यांची आई बरद्वान मेडिकल कॉलेज रुग्णालयात घेऊन गेली होती. परंतु तेथे डॉक्टरांना त्यांना महिन्यानंतर येण्यास सांगितले. परंतु पार्वती यांना ओटीपोटी अधिकच कळा जाणवत होत्या. त्या बसने घरी परतताना त्यांना अधिकच त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्या दोघी गाडीतून उतरल्या. तालितमधील रेल्वे क्रॉसिंगजवळ तिची प्रसूती झाली. तिला मुलगी झाली, असे पार्वती यांच्या आई कल्पना माझी यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना घरी नेण्यात आले. त्यानंतर दुस-याच दिवशी या मुलीचा योग्य उपचाराअभावी मृत्यू झाला, असा आरोप माझी यांनी केला.