आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगालमध्ये न्यायाधीश, कर्मचारी सबकुछ महिला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालदा- देशातील पहिले महिला न्यायालय पश्चिम बंगालमध्ये सुरू होणार आहे. या न्यायालयात केवळ न्यायाधीशच नव्हे, तर सर्व कर्मचारीही महिलाच असतील. या न्यायालयाचे कामकाज गुरुवारपासून सुरू होणार आहे. कोलाकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी बुधवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी या न्यायालयाचे उद्घाटन केले. या न्यायालयात महिलांवरील अत्याचाराचे व त्यांच्याशी संबंधित खटलेच चालवले जाणार आहे. या न्यायालयात एक अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व मुख्य न्यायाधीशांसाठी दोन कोटरूम असतील. पुरुष वकील या ठिकाणी वकिली करू शकतील. मालदा येथे अशा न्यायालयाची सुरुवात महत्त्वाची आहे. कारण या ठिकाणी दाखल एकूण खटल्यांपैकी 28 टक्के प्रकरणे ही महिला अत्याचाराशी संबंधित आहेत.

महिला अत्याचारासाठी चौपट शिक्षा : छत्तीसगडमध्ये महिला व मुलींवर अत्याचार करणा-या आरोपींना आधीपेक्षा चौपट शिक्षा ठोठावण्यात येईल. मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा कायदा मंजूर करण्यात येणार आहे.