आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • West Bengal Teachers Arrested For Strip Searching Girl Student ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थिंनीचे कपडे काढून अंगझडती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरी - चोरीच्या आरोपावरून एका विद्यार्थीनीचे कपडे काढून अंगझडती घेण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दोन शिक्षिकांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.पश्चिम बंगालमधील एका विद्यार्थीनीला स्वमूत्र प्राशन करण्याची शिक्षा देणाची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
पश्चिम बंगालच्या बिरभुम जिल्ह्यातील कालीगती स्मृती नारी शिक्षा निकेतन विद्यालयातील अकरावीच्या विदयार्थीनीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दिडशे रुपये चोरल्याच्या संशयावरून या विद्यार्थीनीची चैताली गुप्ता आणि लिपीका सहा या दोन शिक्षिकांनी तिला टिचर्स रुम मध्ये नेले आणि तिचे कपडे काढून झाडाझडती घेतली. अर्थात एवढे करूनही चोरीस गेलेले पैसे तिच्याकडे सापडलेच नाही. पैसे ही शाळेतीलच एका विद्यार्थीनीचे होते.ही घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर विद्यार्थीनी रडतरडतच घरी आली. याप्रकरणी वडिलांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर दोन्ही शिक्षिकांना अटक करण्यात आली.स्थानिक न्यायालयाने आज दोघींनाही जामीनावर मुक्त केले.दरम्यान, मुख्याध्यापिका कल्पना रॉय यांनी विद्यार्थीनीच्या स्कूल बॅगचीच तपासणी करण्यात आल्याचा दावा केला आहे.