आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What Are Doing About Homeminister: Magistrate Vipalav Dabas

गृहमंत्र्यांविरोधातील तक्रारीचे काय केले ? :महानगर दंडाधिकारी विपलव दाबास यांचा सवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - हिंदू दहशतवादासंबंधी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर पोलिसांनी 6 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
गृहमंत्री यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी करणा-या या तक्रारीवर काय कारवाई करण्यात आली आहे, अशी विचारणा शुक्रवारी महानगर दंडाधिकारी विपलव दाबास यांनी केली. यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.


आरटीआय कार्यकर्ता विवेक गर्ग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे आदेश बजावले आहेत. गृहमंत्र्यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांचा अवमान
केला आहे. त्यांच्या श्रद्धेला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात यावा, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.