आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:\'स्टॅरी नाइट्स\'मधील शोभा डे यांचे लेखन \'सॉफ्ट पोर्नोग्राफी\' वाटते?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शोभा डे यांनी नुकतेच राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. वाद आणि शोभा डे यांचे नातेही पहिल्यापासून कायम राहिले आहे. एकीकडे, त्या राजकीय नेत्यांवर टीका करीत सुटल्या आहेत तर, आता त्यांच्यावरच साहित्य क्षेत्रातून हल्ला झाला आहे. मॅस्से नावाच्या एका भारतीय एनआयआर लेखकाने शोभा डे यांचे लेखन गंभीर नसून साहित्य जगात त्याला कोठेही स्थान नसल्याचे टीका केली. तसेच डे यांचे लेखन म्हणजे 'सॉफ्ट पोर्नोग्राफी'च असल्याचे मत आग्रा येथील ताज साहित्य संमेलनात व्यक्त केले.

शोभा डे या एक स्टायलिश महिला म्हणून चर्चेत राहिल्या आहेतच. त्यांनी एक मॉडेलपासून करिअरची सुरुवात केली असेल पण त्यांना लागलीच एक पत्रकार म्हणून देशात ओळख मिळाली, नव्हे प्रसिद्धच झाल्या. आपल्या करिअरच्या प्रवासात शोभा डे यांनी चित्रपट जगत आणि तेथील गॉसिपसंबंधित खूप काही लिहत प्रसिद्धी मिळवली.

शोभा डे यांच्या जीवनात व त्यांच्याशी संबंधित घडलेल्या घटनांनी, लेखांनी आणि त्यांच्या कादंब-या, पुस्तके ज्याने तुम्हा-आम्हाला 'रूबरू' केले असेल. यातील काही पुस्तके वादग्रस्त राहिली तर काही बेस्ट सेलरही ठरली. शोभा डे यांचे लेखन मॅस्से म्हणतात तसे खरंच सॉफ्ट पोर्नोग्राफीकडे झुकणारे आहे का? हे सांगण्यासाठी आम्ही वाचकांवरच जबाबदारी सोपवणार आहोत.
तर पाहूया, त्याचा एक भाग म्हणून अशाच एका पुस्तकाविषयी भाष्य करणार आहोत ज्या पुस्तकात फिल्मी दुनियेतील चार अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या नात्यातील गुंफण केली आहे, जे कधी एकेकाळी टॉपवर होते.