आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअशोकनगर - सूर्यावरील डागांमुळे (सन स्पॉट) वर्षातील तीन ऋतूंच्या वेळेत मोठे फेरबदल झाले आहेत. हे बदल सध्या सुरुवातीच्या टप्प्यात असून ते 2016 पर्यंत हवामान बदलाचे टोक गाठतील. त्यानंतर हे परिवर्तन उतरणीला लागेल व 2020 पर्यंत देशातील हवामान सामान्य होईल. म्हणजे हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हे निर्धारित वेळेनुसार बदलतील, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
इस्रोच्या अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे वरिष्ठ वैज्ञानिक व चांद्रयान मिशन ऑफ इंडियामध्ये मोलाची भूमिका बजावत असलेले डॉ. राजमल जैन यांनी हा दावा केला आहे. ‘दिव्य मराठी नेटवर्क’ला डॉ. जैन यांनी सांगितले ही, हवामानातील हे बदल दर 80 वर्षे व 200 वर्षांनी येतात. सध्याचा हा बदल 80 वर्षांनी आलेला आहे. सूर्य आपल्या अक्षाभोवती 27 दिवसांतून एक फेरी मारतो तो वरच्या आणि खालच्या अक्षावर फिरत राहतो. त्यातून चुंबकीय क्षेत्रात तणाव निर्माण होतो व डाग तयार होतो. त्याला सन स्पॉट असे म्हणतात. त्याच्या मधला कालावधी बदलत राहतो. तो 11 ते 22 वर्षांचा असू शकतो. त्यांची संख्या वाढत जाते व 80 वर्षांची सायकल तयार हाते. त्यामुळेच हवामानात मोठे फेरबदल होतात.
असा होतो परिणाम
डॉ. जैन यांच्या म्हणण्यानुसार 11 वर्षांच्या चक्रात पाऊस प्रभावित होतो. त्यामुळे अधिक पाऊस होतो. तर चक्र परिवर्तनानंतर 22 वर्षांच्या बदलामुळे पाऊस गायब होऊन दुष्काळी स्थिती तयार होते. (सध्या काही भागात तशी आहे)
‘ग्लोबल वॉर्मिंग’ची ओरड म्हणजे खोटारडेपणा
जगात कुठेही ग्लोबल वॉर्मिंगसारखी स्थिती नाही. हवामान बदलास सन स्पॉट जबाबदार आहेत. विकसित देशांनी भारतावर कार्बन डायऑक्साइडचा मोठा उत्सर्जक देश म्हणून ठपका ठेवला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, भारतातून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साइड विकसित देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. पृथ्वीचे तापमान 0.5 टक्के वाढण्याला सूर्यावरील घडामोडी कारणीभूत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.