आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Cant Muslim Cop Sport Beard, Asks Supreme Court

दाढी राखण्याचे वा कापण्याचे दंडक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाढी राखण्यावरून पोलिस खात्यात काथ्याकूट सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने याविषयी केंद्र सरकारकडे विचारणा केली आहे. मर्जीनुसार दाढी वाढवावी की, दाखवण्यासाठी वाढवावी? तुम्हीच सांगा! लष्करात दाढीवर अनेक निर्बंध तर काही सवलतीही असतात. तर जाणून घेऊया हे दाढीपुराण...

पोलिस : काश्मीरमध्ये नोकरीपूर्वीची दाढी चालेल
जम्मू-काश्मीरच्या पोलिस दलात दाढी राखण्याची सवलत आहे. मात्र, ती भरतीनंतर ट्रेनिंग काळापासूनच राखावी लागते. त्यानंतर नाही. देशातील इतर राज्यांमध्ये पोलिसांना परवानगी घेऊनच दाढी राखता येते. तसेच मध्य प्रदेशातील ज्या पोलिसांच्या मिशा आकर्षक असतील त्यांचे वरिष्ठ अधिका-यांकडून कौतुक होते.

धार्मिक श्रद्धा, सण आणि दाढी राखण्याची सवलत
शीख : सर्व लष्करी दले व नोक-यांमध्ये शिखांना दाढी राखण्यास परवानगी आहे. कारण दाढी कापणे धर्मानुसार वर्ज्य आहे. मात्र, आर्मीच्या शीख यूनिटमध्ये शीखेतरालाही दाढी राखावी लागते.

इस्लाम : लष्कर व पोलिस दलात रमजानदरम्यान परवानगी घेऊन दाढी राखण्याची सवलत आहे. त्याव्यतिरिक्त नाही. तथापि पोलिसांची काही प्रकरणे कोर्टापर्यंत गेली व त्यांना सवलत मिळाली.

लष्कर : सियाचिनमध्ये आणि सबरीमालावर श्रद्धेपोटी परवानगी
सियाचिनमध्ये तैनातीदरम्यान तेथे अत्यंत थंड हवामानात पाण्याचा अपव्यय परवडणारा नसतो आणि रोज दाढी करणेही शक्य नसते.

सबरीमाला : धार्मिक श्रद्धेनुसार भाविक येथे येताना दाढी काढत नाहीत. त्यामुळे एखाद्या सैनिकाला सबरीमाला येथे दर्शनासाठी जायचे असेल तर एक महिना आधी दाढी राखण्याची सवलत मिळते.

हवाई दल : हवेत उडू नये दाढी
2004 नंतर दाढी-मिशा वाढवण्यावर बंदी आहे. मात्र, एखाद्या मुस्लिम सैनिकाला दाढी राखायची असेल तरी त्याला परवानगी घ्यावी लागते. हवेत उडू नये इतपतच दाढी वाढवावी, असे त्याला बजावले जाते. दाढीमुळे गणवेशाची शान कमी होऊ नये, असा नियम आहे.

नौदल : आधी पाण्याचे मोल जाणा, मग कितीही वाढू द्या दाढी
नौसैनिक दाढीमिशा राखू शकतात. हा नियम इंग्रजांनीच केला होता. कारण समुद्रसफरीवर नेलेले पाणी पुरवून वापरावे लागे. तेव्हा उच्चपदस्थ अधिकारीच दाढी करत. कारण तसे करणे रॉयल मानले जात असे.

न्यायालयातही दाढीवरून ओढाताण
देशातील सर्वच मुस्लिम दाढी राखतात, असे नाही. त्यामुळे अधिकार व व्यक्तिगत श्रद्धांमध्ये फरक केला पाहिजे. सोबत राहणा-यांमध्ये साम्य दिसावे यासाठी शिस्तीचे हे नियम करण्यात आले आहेत. - सुप्रीम कोर्ट बेंच, दाढी वाढवली म्हणून मुस्लिम विद्यार्थ्याला मिशनरी शाळेतून काढल्याप्रकरणी वक्तव्य. (30 मार्च 2009)

कुणाला दाढी राखण्यापासून रोखणारा कोणताही कायदा देशात नाही. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. येथे कुणा अधिका-याच्या मर्जीने निर्णय होऊ शकत नाहीत. भले तो कितीही वरच्या पदावर असला तरी. - दिल्ली हायकोर्ट बेंच, दाढी राखल्यावरून लष्करातील जवानाचे कोर्ट मार्शल करण्याचा आदेश रद्द करतानाचे वक्तव्य. (18 डिसेंबर 2003)

दाढी, शेव्हिंग व भूतकाळ
1847, ब्रिटनच्या विल्यम हेनसनने दाढी करण्याचे यंत्र बनवले. ते आजकालच्या शेव्हिंग यंत्रासारखेच होते. ते रातोरात लोकप्रिय झाले. इंग्रजांनी शेव्हिंगची सांगड आपल्या मानमरातबाशी घातली आणि तेव्हापासून लष्कराचे ते अनिवार्य रुटीन बनले.