आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Should Run Everywhere, Face Would Coulor Mamta Warn The Journalist

प्रत्येक ठिकाणी का धावता, थोबाड रंगवीन! - ममतांची पत्रकारांना इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता पत्रकारालाही धमकी दिली आहे. ‘आपण सर्व असभ्य आहात. तुम्ही प्रत्येक ठिकाणी का धावता? तुम्ही येथून निघाला नाहीत तर मी तुमचे थोबाड रंगवीन’ अशा शब्दांत ममतांनी पत्रकाराला दटावले.

वृत्तवाहिन्यांवरील वृत्तानुसार, राज्य सरकारच्या माटी उत्सवादरम्यान हा प्रकार घडला. मागील काही दिवसांच्या घटनांमध्ये ममता आक्रमक झाल्याच्या दिसून आल्या आहेत. गाडी येण्यास विलंब झाल्यामुळे त्या मागे आपल्या सुरक्षा रक्षकावरही भडकल्या होत्या. निष्काळजीपणा करणा-यांच्या कानशिलात ठेवून द्यायला पाहिजे, असे ममता त्या वेळी म्हणाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी आता काय पंतप्रधानांना मारहाण करायची, असे वक्तव्य केले होते. अन्नधान्याच्या दरवाढीबद्दल ममता म्हणाल्या की, पंतप्रधानांना दरवाढ मागे घेण्याची विनंती केली आहे. आता मी अजून काय करू शकते? पंतप्रधानांना मारहाण करू?