आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचारासाठी उद्युक्त करणारी पत्नी तुरुंगात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खांडवा (म. प्र.) - बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात विशेष न्यायाधीशांनी खांडवा येथील तत्कालीन रेंजरला 4 वर्षे तुरुंगवास आणि एक कोटी दंडाची शिक्षा ठोठावली. पतीला भ्रष्टाचारासाठी उद्युक्त करण्याच्या आरोपाखाली रेंजरच्या पत्नीलाही न्यायालयाने 3 वर्षे तुरुंगवास, 25 हजार दंड ठोठावला.

विशेष न्यायाधीश आशिता श्रीवास्तव यांनी कालीभीत फॉरेस्टचे तत्कालीन रेंजर हरिशंकर गुर्जर याला या प्रकरणात दोषी ठरवले. लोकायुक्त पोलिसांनी 14 जुलै 2009 रोजी गुर्जरच्या घरावर धाड टाकून 2.5 लाख रुपये किंमतीच्या सोन्याचांदीसह 1 कोटी 11 लाख रुपये जप्त केले होते. पत्नी सीमा यांनाही दोषी ठरवण्यात आले होते.
सीमा यांना तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.