आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Will Not Marry A Murderer, Says Girl As She Sends Wedding Party

आरोपीशी विवाहास तरुणीचा नकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - हत्येच्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आरोपीसोबत विवाह करण्यास येथील एका तरुणीने साफ नकार दिला. त्याशिवाय भावी नवरोबांना न्यायालयास शरण जाण्यासही भाग पाडले. त्यामुळे हे लग्न गुंडाळावे लागले.

मथुरेतील तरुणीने हे धाडस दाखवले. तिने आपला नियोजित पतीला लग्नास ऐनवेळी नकार दिला. सचिन तोमर असे या तरुणाचे नाव असून तो अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. विवाह ठरल्यानुसार तोमर वºहाडासह मथुरेत आला होता, परंतु त्याला या धाडसी तरुणीने स्पष्ट शब्दांत नकार दिला. ग्वाल्हेरमधील गोलाखा मंदिर भागात पॉपर्टी डीलर चक्रेश पांडे हत्येप्रकरणात तोमरचा हात असल्याचा आरोप आहे. हत्येप्रकरणात सापडलेली मोटारसायकल तोमरची असल्याचा आरोप आहे. अजय यादव नामक दुस-या प्रॉपर्टी डीलरने पांडेची हत्या केली असून त्यासाठी तोमरची गाडी वापरली होती. त्यामुळे तरुणीने लग्नास नकार दिला.

निर्णयावर ठाम
विवाहघटिका समीप आलेली असताना मुलीनेच अचानक अशी भूमिका घेतल्याने घरचे लोक हैराण झाले. त्यांनी मुलीचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. अखेर नवरा मुलगा खजील झाला. त्यानंतर त्याने न्यायदंडाधिकारी सचिन चतुर्वेदी यांच्यासमक्ष शरणागती पत्करली.