आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • With Kalmadi 10 Persons Chargesheet Finalised: Commonwealth Scam

कलमाडी यांच्यासह 10 जणांवर आरोप निश्चित : राष्‍ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्‍ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यात विशेष सीबीआय न्यायालयाने काँग्रेस खासदार सुरेश कलमाडी यांच्यासह अन्य नऊ जणांवर आरोप निश्चित केले. त्यांच्यावर फसवणूक व गुन्हेगारी कटासह 90 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

आरोपींमध्ये कलमाडी यांच्यासह ललित भनोत, व्ही. के. वर्मा, सुरजित पाल, ए. एस. व्ही. प्रसाद, एम. जयचंद्रन आदींचा समावेश आहे. राष्‍ट्रकुल स्पर्धेसाठी टायमिंग, स्कोअरिंग, निकाल देणा-या यंत्रणा लावण्यासाठी चढ्या दराने कंत्राटे दिल्याचा कलमाडींवर आरोप आहे.
आयोजन समितीच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीला 90 कोटी रुपयांचा फटका बसल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. या प्रकरणी कलमांडींसह दहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यानंतर सोमवारी न्यायाधीश रविंदर कौर यांच्या पीठापुढे सुनावणी झाली. भारतीय दंड संहितेच्या कलम 13 (1) आणि 13 (2) नुसार कलमाडी व त्यांच्या सहका-या ना दोषी ठरवण्यात आले. भ्रष्टाचार करून वर बनावट कागदपत्रे सादर करणे, धमकावणे व पुरावे नष्ट करणे असे आरोपही त्यांच्यावर ठेपण्यात आले आहेत.