आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

25 मिनिटांत 130 टन वजनी मंदिराची पुनर्स्थापना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - वसंत पंचमीच्या निमित्ताने शुक्रवारी येथील राम जानकी मंदिराची अनोख्या पद्धतीने पुनर्स्थापना करण्यात आली. 130 टन वजनाच्या या मंदिराला मूळ स्थानापासून 400 फूट अंतरावर नेऊन जशास तसे स्थापन करण्यासाठी 25 मिनिटे लागली. दिव्य भास्कर परिसरातील या मंदिराला हलवण्यासाठी गेल्या सव्वा महिन्यापासून प्रयत्न केले जात होते. एखाद्या मंदिराला त्याच्या पायासकट यशस्वीरित्या इतरत्र स्थापन करण्याचे हे देशातील पहिलेच उदाहरण आहे. मंदिराला पायासह हलवण्याच्या या कामात 20 लोक दररोज बारा तास परिश्रम करत होते.

रामजी की निकली सवारी..
38 फूट उंच, 16 फूट लांब तसेच नऊ फूट रुंद अशा या पवित्र राम जानकी मंदिराचा पाया सात फूट खोल आहे. मंदिराला नवीन ठिकाणी त्याच स्थितीमध्ये स्थापित करण्यात आले आहे. जॅकच्या मदतीने मंदिराला वर उचलून ट्रेलरमध्ये लिफ्ट करण्यात आले. त्याबरोबर मंदिराची यात्रा सुरू झाली. ताशी अर्धा किलोमीटर अशी ट्रेलरची गती होती. त्यामुळे मंदिराला नवीन स्थानी पोहचण्यासाठी 25 मिनिटे लागली.