आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिथावणी दिल्याशिवाय भारताचा गोळीबार नाही - लष्‍कर प्रमुख विक्रम सिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खैरारेर (उत्तर प्रदेश) - भारतीय लष्कराने कधीही नियंत्रण रेषा ओलांडली नाही अथवा उगीचच गोळीबार केला नाही. प्रतिकार करताना पाकिस्तानी जवान ठार झाला असेल अशा स्पष्ट शब्दात लष्करप्रमुख विक्रमसिंग यांनी पाकिस्तानी लष्कराचे आरोप फेटाळले. लष्करप्रमुखांनी बुधवारी लान्सनायक हेमराज सिंग यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले त्या वेळी ते बोलत होते. आपले जवान कधीही सरहद्द ओलांडत नाही. मानवी हक्काचा आम्ही आदर करतो, पण चिथावणी दिल्यास चोख प्रत्युत्तर देतो असे ते म्हणाले. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी जवान ठार झाल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे.

लष्करप्रमुखांनी वचन पाळले
जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी हल्ल्यात लान्स नायक हेमराज सिंग यांचे शिर कापून नेले होते.त्यानंतर लष्करप्रमुखांनी हेमराजच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचे वचन दिले होते.त्यानुसार बुधवारी लष्करप्रमुख विक्रमसिंग यांनी सपत्नीक खैरारेर गावाला भेट दिली. उभयतांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. हेमराजच्या असीम त्यागाचा लष्कराला आदर असल्याचे सांगून कुटुंबीयांना त्यांचे सर्व हक्क मिळतील अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
10,800वीर नारी देशभरात आहेत. देशासाठी बलिदान देणा-या शहिदांच्या कुटुंबीयांची भेट घेणे माझे कर्तव्यच आहे. परंतु प्रत्येकांची भेट घेणे शक्य नसल्याचे लष्करप्रमुख म्हणाले.